बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ६०० रिक्त पदांसाठी मोठी भरती; अर्ज कसा करायचा जाणून घ्या…

Kishan
3 Min Read

Bank job: बँक ऑफ महाराष्ट्र ही 2500 हून अधिक शाखांचे नेटवर्क असलेली एक आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. सध्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये पात्र उमेदवारांकडून रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीची जाहिरात मानव संसाधन विभागाने प्रसिद्ध केली आहे, आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदाचे नाव:अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार)
भरती विभाग:बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra)
शैक्षणिक पात्रता:कोणत्याही शाखेतील पदवी (जाहिरात PDF मध्ये अधिक माहिती)
एकूण रिक्त पदे:600
वयोमर्यादा:20 ते 28 वर्षे
अर्ज पद्धती:ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज करण्याची अंतिम तारीख:16 ऑक्टोबर 2024

भरतीची मुख्य माहिती:

  • भरती विभाग: बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra)
  • एकूण रिक्त पदे: 600
  • पदाचे नाव: अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार)
  • शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी (जाहिरात PDF मध्ये अधिक माहिती)
  • वयोमर्यादा: 20 ते 28 वर्षे
  • अर्ज पद्धती: ऑनलाइन
  • अर्ज शुल्क:
    • UR/ EWS/ OBC: ₹150 + GST
    • SC/ ST: ₹100 + GST
  • अप्रेंटिस वेतन: ₹9,000/- प्रति महिना
  • कामाचे ठिकाण: संपूर्ण भारत
PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटmsrtc.maharashtra.gov.in
व्हाट्सअँप ग्रुप जॉईन व्हा…व्हाट्सअँप ग्रुप जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा…

शैक्षणिक पात्रता व इतर पात्रता:

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच त्या व्यक्तीला त्याच राज्याच्या/केंद्रशाशित प्रदेशातील स्थानिक भाषा यायला हवी.या नोकरीसाठी २० ते २८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

- Advertisement -

वेतन:

निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ९००० रुपयांचे स्टायपेंड दिले जाईल

अर्ज प्रक्रिया:

  • उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 ऑक्टोबर 2024 आहे.
  • अर्ज सादर केल्यानंतर त्याची प्रिंटआउट घेण्याचा सल्ला दिला जातो.
  • उमेदवारांनी एकाच पदासाठी एकच अर्ज सादर करावा, एकापेक्षा जास्त अर्ज आढळल्यास शेवटचा वैध अर्जच ग्राह्य धरला जाईल.

अर्ज शुल्क

बँक ऑफ महाराष्ट्रमधील या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना १५० रुपये शुल्क भरावे लागेल. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ९००० रुपयांचे स्टायपेंड दिले जाईल. त्याचबरोबर उमेदवारांना आवश्यक ती प्रशिक्षणदेखील दिली जाईल. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

पात्रता आणि महत्वाचे निर्देश:

  • उमेदवाराने त्यांची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर आवश्यक निकष पूर्ण केले पाहिजेत.
  • स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक आहे (वाचन, लेखन आणि बोलणे).
  • उमेदवारांनी ई-मेल आणि इतर संपर्क साधने सतत तपासावीत.

अधिक माहितीसाठी PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

Share This Article
By Kishan
Follow:
Hey there, I'm Kishan Gaikwad, the writer behind news10ment.com. With a genuine love for Writing, I bring 6 years of experience in writing about movies, web series and Job Posting.