लाडकी बहिण योजनेचा अजून 1 रुपया ही मिळाला नाही? तर लगेच करा हे काम, 1 दिवसात जमा होतील 7,500 रुपये

Kishan
6 Min Read

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत सरकार महिलांना 1500 रुपये देत आहे. आता पर्यंत महिलांना या योजनेचे 5 हफ्ते म्हणजेच एकूण 7,500 रुपये महिलांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात आले आहे.

पण अजून आश्या अनेक महिला आहेत ज्यांचा फॉर्म अप्रुव तर झाला आहे पण त्यांना या योजनेचा अजून एक रुपया सुध्दा मिळाला नाही. जर तुम्हाला अजून या योजनेचे पैसे मिळाले नाही तर या पोस्टला काळजी पूर्वक वाचा आणि या मध्ये सांगितलेले काम करा लगेचच 1 दिवसात तुमच्या खात्यात पैसे जमा होतील.

- Advertisement -

आपले आधार कार्ड बँक सोबत DBT साठी लिंक आहे का तपासा

अनेक महिलांना असा गैरसमज आहे की फॉर्म भरते वेळी जो बँक खात दिले आहे त्याच बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत पण अस नाही हे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत जे दर महा 1500 रुपये महिलांच्या खात्यात जमा होत आहे ते सरकार DBT (Direct Beneficiary Transfer) मार्फत करत आहे म्हणजेच आधार कार्ड ज्या बँक खात्या सोबत लिंक आहे त्या खात्यात पैसे जमा होणार आहेत त्या मुळे आपले आधार कार्ड बँक सोबत लिंक असणे गरजेचे आहे. आधार कार्ड बँक सोबत लिंक आहे का पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या पर्यायाचा वापर करू शकता…

UIDAI वेबसाईटद्वारे

  • UIDAI च्या वेबसाईटला भेट द्याUIDAI च्या अधिकृत वेबसाईट वर जा.
  • आधार लिंकिंग विथ बँक अकाउंट स्टेटस निवडा – वेबसाइटच्या “My Aadhaar” टॅबखाली “Check Aadhaar & Bank Account Linking Status” हा पर्याय निवडा.
  • आधार नंबर प्रविष्ट करा – तुमचा १२ अंकी आधार क्रमांक टाका आणि सिक्युरिटी कोड प्रविष्ट करा.
  • OTP प्राप्त करा – तुमच्या आधारशी जोडलेल्या मोबाइल नंबरवर OTP येईल.

आधार सीडींग स्टेटस Inactive असल्यास काय करावे

जर तुमचे स्टेटस Inactive (असक्रिय) असे दाखवत असल्यास तुम्ही आपल्या बँक शाखेत जाऊन आधार सीडिंग म्हणजेच आधार कार्ड बँक खात्याशी dbt साठी लिंक करण्यासाठी फॉर्म भरून अर्ज करू शकता. किंवा खाली दिलेल्या पर्याया नुसार ऑनलाईन आधार सीडिंग करू शकता.

हे पण वाचा: MSRTC Bharti 2024: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये मोठी भरती… आजचं ऑनलाईन अर्ज करा!

माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन आधार सीडिंग कसे करावे?

माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आधार सीडिंगसाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

  1. सर्वप्रथम, तुम्ही npci.org.in या वेबसाइटवर जा.
  2. होम पेजवर, Consumer या पर्यायावर क्लिक करा.
  3. त्यानंतर भारत आधार सीडिंग एनेबल या पर्यायावर क्लिक करा.
  4. आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि बँकेचे नाव व खाते क्रमांक अचूक निवडा.
  5. बॉक्सवर क्लिक करा, कॅप्चा भरा आणि Submit बटणावर क्लिक करा.
  6. तुमची विनंती सबमिट झाल्यानंतर, तुमचे आधार बँकेतून सीडिंग केले जाईल.

जर तुम्हला ऑनलाइन पदतीने आधार सीडिंग करता येत नसेल किंवा तुमच्या बँके सोबत ऑनलाइन पदतीने npci.org.in द्वारे आधार सीडिंग करायचा पर्याय येत नसेल तर तुम्ही ऑफलाईन पदतीने म्हणजेच बँक शाखेत जाऊन आधार कार्ड बँक खात्याशी dbt साठी लिंक करण्यासाठी फॉर्म भरून अर्ज करू शकता.

लवकर आधार सीडींग करण्यासाठी पोस्ट बँकेत खाते बनवणे

जर तुमच्या बँकेत जाऊन व वारंवार फेऱ्या मारून देखील तुमचे आधार सीडिंग होत नसेल तर तुम्ही पोस्ट बँकेत खाते खोलू शकता.

जर तुमचा आधार बँक खात्यासोबत dbt साठी लिंक नसल्यास लवकरात लवकर आधार सीडींग करण्यासाठी आम्ही पोस्ट बँकेत नवीन खाते बनवण्याचा सल्ला देतो कारण पोस्ट बँकेत खाते उघडणे अगदी सोपे आहे आणि या मध्ये आधार सीडिंग लगेच करून मिळते.

पोस्ट बँकेत नवीन खाते बनवण्यासाठी तुम्हाला फक्त सोबत आधार कार्ड आणि आधार कार्ड सोबत लिंक असलेला मोबाईल नंबर जवळ असणे गरजेचे आहे.

आधार स्टेटस active (सक्रिय) असल्यास

जर तुमचे आधार कार्ड सीडींग active दाखवत असेल तर त्या खाली तुम्हाला कोणत्या बँकेसोबत ते लिंक आहे ते दिसले. म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत दर महा भेटत असलेले पैसे त्या बँक अकाउंट मध्ये जमा होत आहेत. तुम्ही तुमच्या बँक शाखेत जाऊन खात्यावर पैसे जमा झाले आहेत का त्याचा चौकशी करा.

आधार स्टेटस Active (सक्रिय) आहे पण ते बँक खाते बंद आहे व त्याचे तुमच्याकडे पासबुक ATM नाही

जर ते बँक खाते खूप जून आहे आणि त्या बँकेचे तुमच्याकडे पासबुक नाही तर तुम्ही बँकेत जाऊन तिथे मॅनेजर किंवा कर्मचाऱ्यांशी बोलून नवीन पासबुक आणि ATM घेऊ शकता. त्या साठी तुम्हाला फॉर्म भरावा लागेल आणि त्या सोबत आपले आधार कार्ड आणि पॅन कार्ड चे झेरॉक्स जोडावे लागतील.

आणि जर तुमचे बँक खाते बंद असेल तर ते तुम्ही पुन्हा चालू करू शकता. जर खाते चालू होत नसेल आणि त्या मध्ये माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही अगोदर सांगितल्या प्रमाणे पोस्ट बँकेत खाते नवीन खाते बनवू शकता त्या मध्ये 7500 जमा होतील

आधार स्टेटस Active (सक्रिय) आहे पण खात्यात अजून पैसे आले नाहीत?

अशा अनेक महिला आहेत ज्यांचे फॉर्म अप्रोव्ह झाले आहे आणि बँक सोबत आधार सीडींग पण आहे पण अजून त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत, अश्या महिलाना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी तक्रार करण्यास सांगतले आहे, जर तुमच्याही खात्यात पैसे आले नसतील, तर तुम्ही खाली दिलेल्या पर्यायानुसार तक्रार नोंदवू शकता.

तक्रार नोंदवण्याचे मार्ग जर तुमच्या खात्यात पैसे आले नसतील, तर तुम्ही खालील मार्गांद्वारे तक्रार नोंदवू शकता

  1. हेल्पलाइन नंबर: तुम्ही हेल्पलाइन नंबर 181 वर कॉल करून तक्रार नोंदवू शकता. हेल्पलाइनवर तुमच्या समस्येचे निराकरण केले जाईल.
  2. शक्ती दूत अ‍ॅप: महिला शक्ती दूत अ‍ॅपद्वारेही आपली तक्रार नोंदवू शकतात. येथे तुमच्या तक्रारीवर कारवाई केली जाईल.
  3. आंगणवाडी केंद्र: महिलांनी आपल्या जवळच्या आंगणवाडी केंद्रात जाऊनही तक्रार नोंदवू शकतात.

महाराष्ट्र सरकार या योजनेद्वारे सर्व पात्र महिलांना लाभ मिळावा यासाठी प्रयत्नशील आहे. जर तुम्हाला अद्याप पैसे मिळाले नसतील, तर वरील पर्यायांद्वारे तक्रार करा आणि तुमच्या समस्येचे निराकरण मिळवा.

Share This Article
By Kishan
Follow:
Hey there, I'm Kishan Gaikwad, the writer behind news10ment.com. With a genuine love for Writing, I bring 6 years of experience in writing about movies, web series and Job Posting.