12वी पासूनच्या शैक्षणिक पात्रतेसह उमेदवारांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम), चंद्रपूर येथे भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, एमपीडब्ल्यू (पुरुष) आणि कर्मचारी परिचारिका यासह एकूण 30 पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी 12वी पासून वैद्यकीय संबंधित पदवीधर, जी.एन.एम./बी.एससी. उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन रु. 18,000/- ते रु. 35,000/- पर्यंत दिले जाणार आहे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज नमुना | येथे क्लिक करा |
शुद्धीपत्रक | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | nhm.gov.in |
व्हाट्सअँप ग्रुप जॉईन व्हा… | व्हाट्सअँप ग्रुप जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा… |
अर्ज सादर करण्याची प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार असून 15 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज सादर करण्याची सुरुवात झाली आहे. हे पदे रिक्त राहू शकतात किंवा पदांच्या ठिकाणांमध्ये बदल होऊ शकतो, ज्यासाठी सर्व अधिकार जिल्हा परिषद, चंद्रपूर यांच्या कार्यालयात राखून ठेवलेले आहेत. पात्र उमेदवारांची संख्या अपुरी असल्यास आवश्यकतेनुसार पात्रता शिथिल केली जाऊ शकते. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध नसल्यास प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना खुल्या प्रवर्गात तात्पुरती नियुक्ती दिली जाईल.
Also Read: Union Bank Of India Bharti 2024: युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 1500 रिक्त पदांची भरती…
उमेदवारांनी अर्ज 28 ऑक्टोबर 2024 सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळता) जिल्हा एनएचएम कार्यालय, जिल्हा क्षयरोग रुग्णालय परिसर, रामनगर चंद्रपूर येथे पोस्टाव्दारे किंवा प्रत्यक्ष सादर करावा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 ऑक्टोबर 2024 आहे, त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. पात्रता निकषांच्या आधारे पात्र/अपात्र यादी जिल्हा परिषद, चंद्रपूर च्या संकेतस्थळावर (https://zpchandrapur.co.in/) व नोटीस बोर्डवर प्रकाशित केली जाईल.
अर्ज सादर करण्याचा पत्ता:
जिल्हा एनएचएम कार्यालय, जिल्हा क्षयरोग रुग्णालय परिसर, रामनगर चंद्रपूर