कोल्हापूर पाटबंधारे मंडळ, कोल्हापूर अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांसाठी नवीन भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या प्रक्रियेमध्ये एकूण 12 पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
भरती प्रक्रिया करार पद्धतीने होणार असून, नियुक्त व्यक्तींनी कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतून सेवा प्रक्रियेला अडथळा आणता कामा नये. त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्रांची गोपनीयता पाळणे अनिवार्य आहे.
अर्ज सादर करण्याची प्रक्रिया
मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना ई-मेलद्वारे कळविण्यात येईल तसेच त्यांचा भ्रमणध्वनीवर लघु संदेश पाठवून सूचित केले जाईल. अर्जात वैध ई-मेल आणि भ्रमणध्वनी क्रमांक देणे आवश्यक आहे. मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी अधीक्षक अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे मंडळाच्या सूचना फलकावर प्रदर्शित केली जाईल.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
नमुना अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | wrd.maharashtra.gov.in |
व्हाट्सअँप ग्रुप जॉईन व्हा… | व्हाट्सअँप ग्रुप जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा… |
अंतिम निवड प्रक्रिया
अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी संबंधित कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावली जाईल आणि त्यांना ई-मेलद्वारे माहिती दिली जाईल.
महत्वाच्या अटी व शर्ती
अर्जदारांना रु. 100/- च्या स्टॅम्प पेपरवर बंधपत्र अर्जासोबत सादर करणे अनिवार्य आहे. समिती योग्य उमेदवार न मिळाल्यास सर्व पदे न भरण्याचा अधिकार राखून ठेवते.
अर्जाचा नमुना आणि अंतिम दिनांक
अर्जाचा नमुना आणि अन्य माहिती कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभाग कोल्हापूर कार्यालय तसेच जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर (https://wrd.maharashtra.gov.in) उपलब्ध आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 14 ऑक्टोबर 2024 आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता: कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभाग क्र. 2, सिंचन भवन परिसर, ताराबाई पार्क, कोल्हापूर – 416003.