स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 1333 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये उद्योग निरीक्षक, कर सहायक, तांत्रिक सहायक, बेलिफ, लिपिक गट क, नगरपाल (शेरीफ), लिपिक-टंकलेखक अशा विविध पदांचा समावेश आहे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | mpsconline.gov.in |
व्हाट्सअँप ग्रुप जॉईन व्हा… | व्हाट्सअँप ग्रुप जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा… |
निवड झालेल्या उमेदवारांचे नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र राज्यात असणार आहे. या भरतीसाठी फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
तथापि, सद्याच्या जाहिरातीत काही मागास प्रवर्ग व समांतर आरक्षणाची पदे उपलब्ध नाहीत. मात्र, जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर किंवा पूर्व परीक्षेचा निकाल लागेपर्यंत काही नवीन मागण्या येण्याची शक्यता आहे. या नव्या मागण्यांद्वारे उपलब्ध होणारी पदे व विद्यमान पदसंख्येतील बदल पूर्व परीक्षेच्या अंतिम निकालाच्या वेळी विचारात घेतली जातील. त्यामुळे, जर एखाद्या उमेदवाराने आरक्षित पद नसल्यामुळे किंवा कमी पदसंख्येमुळे अर्ज सादर केला नसेल, तर निवडीची संधी गमावल्याबाबत नंतर कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही.
अर्ज भरण्याची अंतिम तारीख 04 नोव्हेंबर 2024 आहे.